'या' दारुला कसं पडलं Teachers हे नाव?
टीचर्स हायलँड क्रीम भारतात लाच होणारी पहिला आंतरराष्ट्रीय स्कॉच आहे. आताच्या काळात सर्वाधिक विकली जाणारी टीचर्स ही स्कॉच ब्रँड आहे.
अनेकदा असा प्रश्न पडतो की, टीचर्स व्हिस्कीला हे नाव का दिलं आहे? यामागचं कारण काय?
टीचर्स या व्हिस्कीचं नाव हे विलियम टीचर या नावावरुन घेतलं आहे. कोण आहेत विलियम टीचर आणि टीचर्स व्हिस्कीचा इतिहास.
टीचर्स व्हिस्कीच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर याची गोष्ट 175 सालापूर्वी सुरु झाली. जेव्हा नवीन Excise Act सादर करण्यात आलं.
विलियम टीचरने या सगळ्याकडे एक संधी म्हणून पाहिलं. त्यांच्या आत्मविश्वासातून या व्हिस्की ब्रँडचा जन्म झाला.
1830 मध्ये विलियम टीचरने एका ग्रॉसरी शॉपमध्ये व्हिस्की विकण्याचा परवाना घेतला. दुकानाची मालिक त्याच्या गर्लफ्रेंड एग्नेस मॅकडोनाल्डची आई आहे.
विलियमने 1832 मध्ये एग्नेससोबत लग्न केलं आणि पिकाडिली स्ट्रीटमध्ये 'ड्राम शॉप' सुरुवात केली. या ड्राम शॉपमध्ये कस्टमर्स थांबून चक्क थांबून व्हिस्कीचा आस्वाद घेतला.
1836 मध्ये आपलं दुसरं दुकान सुरु केलं तेव्हा विलियमने बॉटल्ड व्हिस्की विकण्याचा परवाना घेतला. ग्लासगोमध्ये वाढती लोकसंख्या पाहता विलियम टीचरने जवळपास 20 ड्राम शॉप सुरु केले.
या पद्धतीने टीचर्स हायलँड क्रीम व्हिस्की तयार करण्यात आली. विलियम टीचर यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी हे काम पुढे नेलं. यानंतर विलियम टीचर अॅण्ड सन्स नावाने ही कंपनी ओळखण्यात आली.