'या' लोकांनी खाऊ नये शेंगदाणे

तेजश्री गायकवाड
Feb 03,2025


शेंगदाणे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.


शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, लोह, झिंक, पोटॅशियम आणि फॅटी ॲसिड्स आढळतात, ज्याच्या सेवनाने एकूणच आरोग्याला फायदा होतो.


जय लोकांची पचनक्रिया नाजूक असते आणि त्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे, कारण शेंगदाणे पचायला वेळ लागतो.


ज्या लोकांचे यूरिक ऍसिड वाढले आहे त्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे. कारण शेंगदाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील युरिक ऍसिडची पातळी वाढू शकते.


कायण वजन वाढू द्यायचे नाही त्यांनीही शेंगदाणे अत्यंत मर्यादित प्रमाणात सेवन करावे. कारण शेंगदाण्यातील फॅट आणि कॅलरीजमुळे वजन वेगाने वाढू शकते.


ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी शेंगदाणे खाऊ नये. कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. विशेषतः खारट शेंगदाण्यामध्ये भरपूर मीठ असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story