'या' दिशेला बसून करा अभ्यास, परीक्षेत गुणांची होईल बरसात

Pooja Pawar
Feb 02,2025


वास्तू शास्त्रामध्ये प्रत्येक काम करण्यासाठी एक दिशा निवडण्यात आलेली आहे.


जर मुलांचा अभ्यास चांगला व्हावा असे वाटत असेल तर वास्तू नियमांनुसार काही नियम लक्षात ठेवणं फायदेशीर ठरू शकतं.


वास्तुशास्त्राप्रमाणे अभ्यास करण्यासाठी सर्वात उत्तम दिशा ही उत्तर पूर्व मानली जाते.


मुलांची स्टडी रूम दक्षिण - पूर्व दिशेला नसावी.


मुलांची स्टडी रूम ही घरातील जिन्याच्या खाली नसावी यामुळे त्यांच्या अभ्यासात अनेक अडचणी निर्माण होतात.


मुलांची स्टडीची रचना अशी असावी की अभ्यास करताना मुलांचा चेहरा उत्तर पूर्व दिशेला असेल.


वास्तुशास्त्रानुसार अभ्यासासाठी लागणारी सामग्री ही दक्षिण - पश्चिम दिशेला ठेवावी. उदा. पुस्तकांचे कपाट दक्षिण - पश्चिम दिशेला असावे.


Disclaimer - (या ठिकाणी दिलेली माहिती वास्तुशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story