दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात जे आरोग्यासाठी आवश्यक तसेच फायदेशीर असतात. याच कारणामुळे दुधाला कंपलीट फूड म्हटलं जातं.
परंतु, दालचीनीसोबत दुधाचे सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर नेमके कोणते परिणाम होतात?
तज्ज्ञांच्या मते, दुधात दालचीनी मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
दालचीनीमध्ये मॅग्नेशियम आणि दुधात ट्रिप्टोफॅन हे अॅमिनो अॅसिड असते. हे घटक शरीरातील सरोटोनिनची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरतात. यामुळेच दालचीनी आणि दुधाचे एकत्रित सेवन केल्याने झोप चांगली लागते.
दालचीनी पचनासाठी कारणीभूत असलेल्या एंझाइम्स सक्रिय ठेवते. यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
दालचीनीमध्ये अॅंटीऑक्सीडंट तसेच अॅंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. दुधासोबत दालचीनीचे सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट होण्यासाठी फायद्याचे ठरते.
दालचीनी रक्तदाब कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. दालचीनीसोबत दुध प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल मध्ये वाढ होण्यास मदतशीर ठरते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)