प्रत्येकजण आपल्या चेहरा सुंदर दिसण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतात. अशातच, चेहऱ्यावरील काळ्या डागांमुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो.
चेहऱ्यावरील पुरळ, डार्क सर्कल्स, डाग आणि पिंग्मेंटेशन दूर करण्यासाठी दही हा चांगला उपाय ठरु शकतो. चेहऱ्यावर दही लावल्याने त्वचा उजळ होण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, त्वचा चमकदार होण्यासाठी दही हे फायदेशीर असतेच. मात्र, चेहऱ्यावर दही लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असली पाहिजे.
दही आणि मध एकत्रितपणे चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग तसेच त्वचेतील डेड स्किन सेल्स दूर होण्यास मदत होते.
दह्यामध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होऊन त्वचा ग्लोइंग होण्यास मदत होते. लिंबाचा रस व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत असल्यामुळे त्याचा चेहऱ्याला चांगला फायदा होतो.
ओट्समध्ये त्वचेला खोलवर स्वच्छ करणारा सॅपोनिन हा घटक असतो. तसेच, ओट्समध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असलेले अॅमिनो अॅसिड असते. चेहऱ्यावर ओट्ससोबत दही लावल्याने चेहऱ्यासाठी अधिक लाभदायक ठरते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)