'या' प्रकारे कारल्याची भाजी बनवा; चवीला कधीचं नाही लागणार कडू

Intern
Jan 17,2025


कारल्याची भाजीमध्ये अनेक पोषकतत्त्वं असतात. कारले डायबिटीजपासून हृदय रोगींपर्यंत सगळ्या रुग्णांना फायदेशी ठरते.


परंतु कडवटपणामुळे ही भाजी कोणालाही आवडत नाही. विशेष म्हणजे लहान मुलांना ही भाजी अजिबातच आवडत नाही.


आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे कारल्याची भाजी कडू नाही तर चविष्ट लागेल.


भाजीला कापून त्यावर मीठ घालून अर्ध्या तासासाठी ठेवावे. त्यानंतर भाजी धुवून शिजवावी.


भाजी बनवण्याच्या अगोदर कारल्याचे साल काढून घ्यावे. यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो.


कारल्याला कापताना त्यातील बिया काढून घ्याव्या. त्यामुळे भाजीतला कडवटपणा नाहीसा होतो.


कारल्याला दहीमध्ये एक तास ठेवल्याने त्यातील कडवटपणा कमी होण्यास मदत होते.


कारल्याला डिप फ्राय केल्याने सुद्धा कडवटपणा कमी होतो. कारलं शिजताना त्यात एक चमचा साखर टाकल्याने भाजी चविष्ट लागते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )

VIEW ALL

Read Next Story