ओठांवर लिपस्टिक लावणं ही आता महिलांसाठी एक सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक महिला ओठांचं सौंदर्य वाढवण्यासाठी लिपस्टिक लावतात.
महिलांमध्ये लिपस्टिकचा लाल रंग खूप प्रचलित आहे. अनेक महिलांना त्यांच्या ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावणे खूप आवडते.
परंतु उत्तर कोरियामध्ये लाल रंगाची लिपस्टिक वापरण्यास बंदी आहे.
उत्तर कोरियाने लावलेल्या या बंदीमध्ये ऐतिहासिक आणि राजकीय कारण आहे.
उत्तर कोरियातील प्रशासनाचं म्हणणं आहे की लाल रंग हा साम्यवाद आणि पुंजीवादाशी जोडलेला आहे. जो त्यांच्या समाजवादी सिद्धांताच्या विरोधी आहे.
उत्तर कोरियानुसार लाल रंग हा भांडवलशाही संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मेकअपचा वापर करणे त्यांच्या समाजवादी विचारांच्या विरोधी आहे.
या नियमाचे नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांना मोठा दंड केला जातो.