यूरिक ऍसिड हे शरीरातील वेस्ट प्रोडक्ट असून त्याची शरीरात जास्त वाढ झाली तर ते शरीरासाठी हानिकारक ठरते.
हाय यूरिक ऍसिडची समस्या असल्यास रक्तात यूरिक ऍसिडचे प्रमाण जास्त वाढलेलं असतं. यामुळे हातापायांना सूज येणं वेदना होणे इत्यादी समस्या जाणवू शकतात.
हाय यूरिक ऍसिडमुळे तुमच्या शरीरात गाठी झाल्या असतील तर रक्तातून यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी केळं फायदेशीर ठरतं.
सफरचंदात डायट्री फायबरची मात्रा जास्त असते. जे यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी मदतशीर ठरू शकते. फायबर रक्तप्रवाहातून यूरिक ऍसिडला अवशोषित करते, आपल्या शरीरातून यूरिक ऍसिडला बाहेर काढते.
लिंबूवर्गीय फळं ही व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्रोत आहेत जे यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी मदतशीर ठरतात.
ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर रक्तातील यूरिक ऍसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)