रणवीर इलाहबादीया एक युट्युबर असून चांगला बिझनेसमेनदेखील आहे.
हल्ली रणवीर त्याच्या एका विवादास्पद वाक्यामुळे खूप चर्चेत आहे. त्याने हे विधान 'इंडियाज गॉट टेलेंट' या शोमध्ये केलं होतं.
विवादास्पद विधान केल्यामुळे त्याच्यावर FIR देखील करण्यात आली. नंतर त्याने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती.
इंडियाज गॉट टेलेंट हा स्टँड अप कॉमेडियन समय रैना यांचा लोकप्रिय टी. व्ही शो आहे.
रणवीरने कॉमेडियन भारतीच्या एका शोमध्ये त्याच्या नावाबद्दल खुलासा केला होता.
सगळ्यांना वाटते की त्याचं आडनाव इलाहबादीया आहे म्हणजे तो इलाहबादचा (प्रयागराज) असावा.
त्याने स्पष्ट केलं की त्याचे कुटुंबीय पाकिस्तानहून इथे आले तेव्हा त्यांच्यामधील एकाला 'इलमवादी' ही उपाधी दिली.
कालांतराने इलमवादीचं इलाहबादी झालं. पण, रणवीरचं खरं नाव 'रणवीर सिंह अरोडा' आहे.