महाभारत काळात द्रौपदीचा विवाह पांडवांशी म्हणजेच पाच भावांशी झाला होता. ज्याबद्दल आपल्या सर्वांना चांगलेच माहिती आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का की हीच प्रथा आजही भारतातील काही भागात प्रचलित आहे.
होय, त्या ठिकाणी एका महिलेला एकापेक्षा जास्त पती आहेत. द्रौपदी आणि कुंतीच्या वनवासापासून ही परंपरा तिथे चालू आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील सुमारे 350 वसाहतींमध्ये ही प्रथा सुरू आहे.
या प्रथेद्वारे गरिबी आणि जमिनीचे वाटप थांबवता येईल, असा येथील लोकांचा विश्वास आहे.
असे सांगितले जाते की, येथे मुलीचे लग्न झाले की, कुटुंबीय तिच्या सासरच्या सर्व मुलांची माहिती गोळा करतात आणि नंतर तिचे लग्न सर्व भावांशी लावून देतात.
याशिवाय महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तरी पतीच्या मृत्यूनंतर विधवा होण्याचे दु:ख तिला सहन करावे लागत नाही. जोपर्यंत तिचा नवरा जिवंत आहे तोपर्यंत ती विवाहित स्त्री राहते.
लग्नानंतर, जर भाऊ वधूसोबत खोलीत असेल तर तो आपली टोपी दारात ठेवतो आणि बाकीचे भाऊ या परंपरेचा आदर करतात.
एवढेच नाही तर या ठिकाणी घरातील प्रमुख पुरुष नसून महिला असते.