विमान प्रवासात किती वर्षांपर्यंतच्या मुलांना तिकीट लागत नाही?

Feb 11,2025


प्रत्येकालाच विमानाच्या प्रवासाबद्दल नेहमीच आकर्षण वाटत असते. कारण विमानाचा प्रवास हा लहानांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांसाठीच आरामदायक असतो.


विमानाचा प्रवास जरी सुखकर असला तरी फ्लाईटमधून जाण्यासाठीचा खर्च हा बस किंवा ट्रेनच्या प्रवासापेक्षा कित्येक पट अधिक असतो.


ट्रेनमध्ये सात वर्षांपर्यंतच्या मुलांचे तिकीट लागू होत नसल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, विमानाच्या प्रवासात नेमकं किती वर्षांपर्यंतच्या मुलांचे तिकीट लागत नाही? हे तुम्हाला माहित आहे का?

एअरलाइन्सचा नियम

एअरलाइन्सच्या नियमांनुसार, 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना तिकीट लागू होत नाही.

2 वर्षांपेक्षा लहान मुले

परंतु, काही एअरलाइन्समध्ये 2 वर्षांपेक्षा लहान मुलांचंसुद्धा तिकीट घ्यावं लागतं. याला इंफेंट तिकीट असं म्हणतात.

लहान मुलांसाठी फ्लाइटचे तिकीट

लहान मुलांसाठी फ्लाइटचे तिकीट हे 1200 ते 2000 रुपये इतके असते. तिकीटाचं नेमकं शुल्क किती हे त्या त्या एअरलाइन्सवर आधारित असते.

आंतरराष्ट्रीय प्रवास

जर लहान मुलांसोबत परदेशात फिरायला जात असाल्यास त्यांचे तिकीट काढणे अनिवार्य असते. आंतरराष्ट्रीय प्रवासात तर 2 वर्षांहून लहान मुलांचेसुद्धा तिकीट काढावे लागते.

मुलांचे ओळखपत्र

फ्लाइटमध्ये प्रवास करताना मुलांचे ओळखपत्र सोबत ठेवा आणि मुलांचे ओळखपत्र नसल्यास त्यावेळी आपले ओळखपत्र दाखवा.

VIEW ALL

Read Next Story