डाव्या बाजूला झोपल्याने शरीराला अनेक पद्धतीने फायदा होतो. चला जाणून घेऊयात फायदे..
आयुर्वेदानुसार डाव्या बाजूला झोपणे घोरणे कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. झोपण्याची ही स्थिती तुमच्यासाठी सर्वात आरामदायक वाटू शकते.
डाव्या बाजूला झोपल्याने अन्नाचे पचन बरोबर होते. यामागील तर्क असा आहे की तुमचे सर्व पाचक रस खालच्या दिशेने राहतात आणि यामुळे छातीत जळजळ सारख्या समस्या कमी होतात आणि अन्न सहज पचते.
डाव्या बाजूला झोपल्याने शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर होतात आणि लिम्फ द्रव आणि घाण साफ होते. कोणताही मोठा आजार टाळण्यासाठी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे आवश्यक आहे.
हृदयावर दबाव जाणवत नाही आणि हृदय योग्य पद्धतीने काम करतं.
पचन चांगले होते आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)