इंग्लंड विरुद्ध शेवटच्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांना अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे.
आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी देखील अवयव दानासंबंधित काही माहिती शेअर करून अवयव दान करण्याचे आवाहन केले.
अहमदाबादच्या स्टेडियममध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटच्या सामन्यापूर्वी अवयव दानासंबंधित एक खास कार्यक्रम आयोजित केला जाईल.
भारताच्या अनेक क्रिकेटर्सनी यापूर्वीच अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यात माजी क्रिकेटर विनोद कांबळीचा देखील समावेश आहे.
2014 मध्ये विनोद कांबळी याने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने डोनर कार्डवर सही करून आपले अवयव नर्मदा किडनी फाउंडेशनला दान करण्याचा निर्णय घेतला होता.
विनोद कांबळी सध्या त्याच्या आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त आहे. त्याला चालताना देखील अनेक अडचणी येतात. तसेच त्याची आर्थिक स्थिती सुद्धा फार बरी नाही.
विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 17 टेस्ट, 104 वनडे खेळले आहेत. यादरम्यान त्याने 3561 धावा केल्यात.