'या' धर्मातील लोकं आहेत सर्वात श्रीमंत

Pooja Pawar
Feb 08,2025


आयुष्यात खूप पैसे कमवावा, श्रीमंत व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. प्रत्येकजण त्याच्यासाठी मेहनत देखील घेतात.


आज तुम्हाला जगातील कोणत्या धर्मातील लोक जास्त श्रीमंत असतात याबाबत सांगणार आहोत.


न्यू वर्ल्ड वेल्थच्या रिपोर्टनुसार, जगभरात सर्वात जास्त संपत्ती ही ख्रिश्चन धर्मियांकडे आहे.


श्रीमंतीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर मुसलमान आणि तिसऱ्या क्रमांकावर हिंदूंचा समावेश आहे.


तसेच रिपोर्टनुसार जगातील संपत्तीचा एक मोठा हिस्सा अशा लोकांकडे आहे जे कोणताही धर्म मानत नाहीत.


रिपोर्टनुसार ख्रिश्चन धर्माच्या लोकांकडे जवळपास 107,280 बिलियन अमेरिकी डॉलरची संपत्ती आहे. जे जगातील एकूण संपत्तीच्या 55 टक्के भाग आहे.


संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मुस्लिम लोकांकडे 11,335 बिलियन अमेरिकी डॉलरची संपत्ती आहे. जो जगाच्या एकूण संपत्तीचा 5.9 टक्के भाग आहे.


हिंदू धर्मीय लोकांकडे 6,505 बिलियन अमेरिकी डॉलरची संपत्ती आहे. जे जगाच्या संपत्तीच्या तुलनेत 3.3 टक्के आहे.


यहूदी धर्मीय लोकांकडे 2,079 बिलियन अमेरिकी डॉलर संपत्ती आहे. जगातील 10 श्रीमंत देशांपैकी सात देश ख्रिश्चन बहुसंख्य आहेत

VIEW ALL

Read Next Story