सैफ अली खानच्या घरात 16 जानेवारीला रात्री एका अज्ञात व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला.
या घटनेनंतर सैफ वेळेवर दवाखान्यात पोहोचून उपचार घेतले. उपचारानंतर सैफ पुन्हा घरी परतला.
या घटनेला 25 दिवस उलटून गेले आहेत आणि आता सैफने 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर चर्चा केली आहे.
सैफने संपूर्ण घटनेविषयी सांगितले. त्यावेळी त्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रियांबद्दल विचारले गेले.
यावर सैफने सांगितले की, जेव्हा तो जेहला भेटला, तेव्हा त्याने त्याला प्लास्टिकची तलवार दिली.
एवढेच नाही, तर त्याने तलवार जवळ ठेवण्याचा सल्ला देखील दिला.
यासोबतच त्याने असेही म्हटले की, 'गीताने अब्बांना वाचवले आणि अब्बांनी मला वाचवले.'
खरंतर, जेव्हा सैफ अली खान आणि घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीचे भांडण सुरू होते, तेव्हा त्याची मोलकरीण गीताने सैफला वाचवले होते.