या जगात वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य पक्षी आहेत. तसेच, पक्ष्यांचे असे काही प्रकार आहेत ज्यांच्याविषयी आजही अनेकांना माहित नाही.
तुम्हाला जगातील सर्वात महागड्या पक्ष्याविषयी माहितीये का? चला, अशा खास पक्ष्याविषयी जाणून घेऊया ज्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल.
या सर्वात महागड्या पक्ष्याचं नाव आहे, रेसिंग कबूतर.
जगातील सर्वात महागड्या पक्ष्यांमध्ये रेसिंग कबूतरचं नाव सगळ्यात आधी घेतलं जातं.
रेसिंग कबूतरची किंमत त्यांची शारिरीक वैशिष्ट्ये आणि शरीरयष्टी यावर आधारित असते.
खरंतर, रॉल्स रॉयस कारची किंमत ही 7 कोटी रुपयांपासून सुरू होत असल्याचे सर्वांनाच माहित आहे.
मात्र रेसिंग कबूतरची किंमत याहूनही जास्त किंमत म्हणजेच 14 ते 15 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.
तसेच, न्यूझीलँडमधील हुइया या प्रसिद्ध नामशेष पक्ष्याच्या पंखाचा 23 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा लिलाव करण्यात आला होता.