चीनच्या शांघाईमध्ये एका मुलीने आपल्या आईचे 10 लाख युआन म्हणजेच 1.16 कोटी किंमतीचे दागिने चोरले.
मग हे दागिने तिने 60 युआन म्हणजेच भारतीय रुपयात पाहिलं तर अवध्या 680 रुपयांना विकले.
तिला लिप स्टड आणि कानातले खरेदी करायचे होते. यासाठी तिने हा सर्व खटाटोप केला.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये यासंदर्भात वृत्त देण्यात आले. मुलीची आई वांग हिने पुटओ पब्लिक सिक्योरिटी ब्युरोच्या वानली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
आपल्या लेकीने नकळत आपल्या किंमती बांगड्या, हार आणि रत्नांसहित जास्त किंमतीचे दागिने नकली समजून विकले. मुलीला हे का विकायचं होतं? हे तिला कळालं नव्हतं.
लेकीने आईला सांगितलं, 'त्या दिवशी मला पैशांची खूप गरज होती. म्हणून 60 युआन म्हणजेच 680 रुपयात दागिने विकले.'
'मी कोणालातरी लिप स्टड घातलेलं पाहिलं. मला ते आवडलं आणि मलाही तसं हवं होतं.', असे तिने सांगितले.
लिप स्टडची किंमत 30 युआन म्हणजेच 340 रुपये होती.तिला 30 युआनची आणखी एक जोडी हवी होती. म्हणून तिने 680 रुपयात दागिने विकले.
पोलिसांनी शोध घेत जेड रिसायकलिंगच्या दुकानाचा शोध लावला. जिथे सामान विकलं होतं तिथून ते हस्तगत केलं.
हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुलांचे संगोपन कसे करायला हवे?, यावर चर्चा रंगू लागल्या.
जर परिवाराकडे 10 लाख युआन किंमतीच दागिने आहेत तर लेकीला थोडा पॉकेटमनी द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला.