वयानुसार शरीरातील ताकद कमी होऊ लागते. थकवा आणि अशक्तपणा मागे अनेक कारण असतात.
शरीरातील ताकद वाढवण्यासाठी डायटमध्ये काही पदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं.
शरीरातील ताकद वाढवण्यासाठी दुधामध्ये खजूर टाकून खायला सुरुवात करा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा दूर होतो.
खजूरमध्ये मॅगनीज, फॉस्फरस, मॅग्निशियम, पोटँशियम, प्रोटीन, झिंक, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए इत्यादींच प्रमाण भरपूर असतं. जे पुरुषांमधील अशक्तपणा दूर करतात.
रात्री जेवण केल्यावर 2 तासांनी आणि झोपण्याच्या 1 तासापूर्वी दूध आणि खजूरचे सेवन करू शकता. खजूरच्या सेवनामुळे ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होऊन चांगली झोप येते.
खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असून यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच पचनसंस्था मजबूत होते.
पोट खराब झालं असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही आहारात खजूर आणि दुधाचा समावेश करू शकता.
रात्री दुधासोबत खजूर खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. रात्री गरम दुधासोबत 2 ते 3 खजूर खायला खाऊ शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)