प्रत्येकाला वाटतं की आपण तरुण दिसावं. त्यासाठी लोकं त्यांच्या डायटमध्ये खूप गोष्टी सहभागी करतात.
तरुण दिसण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम वापरतात. मात्र, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे डायट आहे त्याकडे एक नजर टाकूया...
जर तुम्ही तुमच्या डायटमध्ये हिरव्या भाज्या सहभागी केल्या तर तुम्हाला तरुण राहण्यास मदत होते.
ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात फायदेकारक आहे. ग्रीन टीमुळे तुम्ही तरुण दिसता.
बेरीज या तुमच्या आरोग्यासाठी फायदेकारक असतात. त्याचे त्वचेला देखील अनेक फायदे आहेत.
रोज फळं खाल्यानं तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे रोज सकाळी एक फळ खा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)