आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आकाशात सूर्य सकाळी आणि चंद्र रात्री दिसतो. त्यामुळे मध्यरात्री सूर्य दिसणे ही सामान्य घटना नाही.
या घटनेच्या मागे मुख्य नैसर्गिक कारण आहे ते पृथ्वीचा कल आणि सूर्याची परिक्रमा.
असे अनेक देश आहेत जिथे वर्षातून काही महिने मध्यरात्री आकाशात सूर्य दिसतो. या देशांना 'मिडनाइट सन' देशाच्या नावाने ओळखळे जाते. जाणून घेऊया कोणते आहेत हे देश.
नॉर्वेला 'मिडनाइट सनची भूमी' या नावाने ओळखला जातो. इथे जवळजवळ 70 दिवसांपर्यंत मध्यरात्री सूर्य आकाशात दिसतो.
स्वीडनमध्ये सुमारे 50 दिवसांपर्यंत आकाशात मध्यरात्री सूर्य बघायला मिळतो.
फिनलॅंड या देशातही वर्षातून काही महिने मध्यरात्री सूर्य दिसतो.
आइसलॅंडमध्ये मध्यरात्री आकाशात हे सुंदर दृश्य बघायले मिळते.
कॅनडाच्या काही भागात मध्यरात्री आपल्याला सूर्य बघायला मिळतो.