ऑफिसमध्ये झोप येते? करा 'हे' उपाय

Oct 12,2024


अनेकांना कामाच्या ठिकाणी झोप येते. त्यामुळे कामात पूर्ण लक्ष लागत नाही. शिवाय थकवाही जाणवतो. पण यावर आमच्याकडे काही प्रभावी उपाय आहेत.

1. ब्रेक घ्या

दर अर्ध्या ते 1 एक तासानंतर 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. त्यावेळात एक फेरफटका मारून या. त्याने तुम्हाला झोप येणार नाही.

2. पाणी प्या

डिहायड्रेशनमुळे थकवा येऊ शकतो. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी पित रहा.

3. चांगला आहार

आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी आपल्या झोपेवर परिणाम करतात. ताजे आणि पौष्टिक अन्न खाल्यास तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि झोपही अवेळी लागणार नाही.

4. दीर्घ श्वासोच्छ्वास

दीर्घ श्वासोच्छ्वास करणे रक्ताभिसरण सुधारण्यास, रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.

5. प्रेशर पॉइंट्स

तुमच्या मनगटाच्या वरच्या भागाच्या प्रेशर पॉइंट्सची मालिश करा. त्यामुळे तुमची उर्जा वाढते असे मानले जाते. हा उपाय तुम्ही करून बघू शकता.

5. प्रकाश वाढवा

मंद प्रकाशामुळे तुम्हाला अधिक थकवा जाणवू शकतो, म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तिथे प्रकाश वाढवा.

7. या गोष्टींचा श्वास घ्या

निलगिरी, पेपरमिंट, बर्गामोट, लिंबू किंवा कापूर यांसारख्या गोष्टींचा वास श्वास घेतल्याने आपला मेंदू जागृत होतो. त्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही.

8. सहकर्मचाऱ्यांशी बोला

काम करताना मूड चांगला राहण्यासाठी तुम्ही सहकर्मचाऱ्यांशी थोड्याफार गप्पा मारू शकता.

9. पॉवर नॅप घ्या

एखाद्या वेळी जर काम करताना खूपच झोप येत असेल तर, 10 ते 15 मिनिटांची पॉवर नॅप घ्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story