महाभारतामध्ये कर्ण सुद्धा प्रमुख पात्रांपैकी एक आहे. त्याची दुर्योधनाबरोबरची मैत्री खरोखरच वाखाणण्या जोगी होती.
कर्ण हा दानशूर म्हणूनही ओळखला जायचा. त्याच्या दातृत्वासाठी तो फार प्रसिद्ध होता.
कर्णधाला जन्मानंतर कुंतीनेच नाकारलं. अगदी लहान असतानाच कुंतीने त्याला नदीत सोडून दिल्यानंतर एका सारथीने त्याला संभाळल्याने त्याला सूत पुत्र म्हणूनच ओळख मिळाली.
कर्ण महाभारतामध्ये कौरवांकडून लढला. मात्र मृत्यूपूर्वी त्याने भगवान श्रीकृष्णाकडून काही वरदान मागितले होते.
माझा मान, सन्मान कायम राखला जावा अशी माझी इच्छा असल्याचं कर्णाने कृष्णाला मृत्यूपूर्वी सांगितलं.
यापूर्वी कोणाचेही अत्यंस्कार झाले नाहीत अशा जागी माझे अत्यंस्कार केले जावेत अशी मागणी कर्णाने श्रीकृष्णाकडे केली.
ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीच कोणतं पाप केलं नाही त्यानेच माझे अंत्यस्कार करावेत, अशी कर्णाची कृष्णाकडे मागणी होती.
माझ्या अस्थि अशा ठिकाणी सोडल्या जाव्यात जिथे यापूर्वी कधी कोणाच्या अस्थि विसर्जित करण्यात आलेल्या नाहीत, असंही कर्णाने श्रीकृष्णाकडे वरदान मागताना म्हटलं होतं.
(डिस्लेमर : सर्व माहिती समाजिक मान्यतांवर आधारित आहे. zee24tass.com याचा पाठपुरावा करत नाही.)