आकाशात उडणे हे पक्ष्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. परंतु, पक्ष्यांच्या अशा काही प्रजाती आहेत, जे पंख असूनही उडू शकत नाही.
अशा 8 पक्ष्यांबद्दल जाणून घेऊयात, भूतकाळात काही काळापर्यंत उडू शकत होते, मात्र, कालांतराने त्यांची उडण्याची क्षमता लोप पावली.
जगभरातील पेंग्विनच्या सर्वच 18 प्रजाती या उडू शकत नाहीत. पोहणे हे पेंग्विनचे खास वैशिष्ट्य आहे.
घुबडासारखे तोंड आणि पोपटासारखे शरीर असणारा काकापो हा पक्षी न्यूझीलेंडमध्ये आढळतो. या पक्ष्यामध्ये उडण्याची क्षमता नसते.
ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा कॅसोवरी ही पक्षी उडू शकत नाही. विविधरंगी आणि डोक्यावर आकर्षक पद्धतीचा तुरा असलेला हा पक्षी मनुष्यांसाठी मात्र, घातक ठरतो.
किवी हा एक न उडणारा पक्षी असून तो न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी आहे.
ताकाहे हा मुळचा न्यूझीलंडचा पक्षी आहे. या पक्ष्याची गडद निळ्या आणि हिरव्या रंगाची शरीरयष्टी असून लाल रंगाची चोच असते. हा उडणारा पक्षी 20 वर्षे जगू शकतो.
शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी असून त्याची अंडीसुद्धा तितकीच मोठी असतात. शरीराचे वजन जास्त असल्यामुळे ते उडू शकत नाही.
वेका हा पक्षी न्यूझीलंडमध्ये आढळतो. कोंबडीच्या आकाराचा हा पक्षी उडू शकत नाही.
मोठे पाय असणारा हा पक्षी इमूस पळण्यात तरबेज आहे. मात्र, शरीराचे जास्त वजन आणि लहान पंख असल्याकारणाने ते उडू शकत नाही.