मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या नवनवीन चित्रपटांमुळे आणि वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असते.
बॉलिवूडमध्ये देखील सईने तिच्या 'द सीक्रेट ऑफ शिलेदार्स' या चित्रपटातील दमदार अभिनयाचा डंका वाजवलाय.
या वर्षी सई तिच्या बॅक टू बॅक बॉलिवूड प्रोजेक्ट्ससोबत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.
अलीकडेच सईच्या 'डब्बा कार्टेल' वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला.
या वेबसीरिजमध्ये टिफीन सर्व्हिस चालवणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांच्या स्कॅमची गोष्ट आहे.
सई या वेबसीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
सईचा वैविध्यपूर्ण बॉलिवूड प्रवास इथेच थांबलेला नाही तर ती आणखी अनोख्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे.
येणाऱ्या काही दिवसात सई डब्बा कार्टेल, ग्राउंड झिरो, मटका किंग अशा अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.