जिओकडे खूप सारे रिचार्ज प्लान्स आहेत, जे वेगवेगळ्या सेगमेंट आणि किंमतीत येतात.
आता आपण एका स्पेशल रिचार्जबद्दल जाणून घेऊया.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये यूजर्सना 3 महिने म्हणजे साधारण 84 दिवसांची वॅलिडीटी मिळेल. सर्वात स्वस्त प्लानबद्दल तपशीलवार जाणून घेऊया.
जिओचा रिचार्ज प्लान जिओ पोर्टलवर लिस्टेड आहे. त्यानुसार या प्लानची किंमत 448 रुपये आहे.
या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगदेखील मिळेल.
यूजर्सना 1000 एसएमएस मिळतील. ज्यामुळे संवाद साधणं सोपं होऊन जाईल.
यात तुम्हाला जिओ, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा मोफत एक्सेस मिळेल.
या रिचार्जमध्ये जिओ सिनेमा प्रिमियमचे सबस्क्रिप्शन मिळणार नाही. यासाठी यूजर्सना वेगळे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे प्लान आणण्याचे निर्देश TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना दिले होते. यानंतर जिओसहीत अनेक कंपन्यांनी केवळ कॉलिंग प्लान्स आणले आहेत.
या प्लानसाठी तुम्हाला जिओ पोर्टल आणि मायजिओ अॅपच्या आत रिचार्ज कॅटेगरीमध्ये जावे लागेल.
पुढे व्हॅल्यू कॅटेगरीत तुम्हाला 448 रुपयांचा प्लान मिळेल.