विराट कोहली रचणार इतिहास; उध्वस्त होणार 'युनिवर्स बॉस'चा महारेकॉर्ड

Feb 18,2025


19 फ्रेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. यावेळी हे सामने 'हायब्रिड मॉडेल' अंतर्गत पाकिस्तानातील (कराची, लाहौर, रावलपिंडी) तीन शहरात आणि दुबईमध्ये खेळले जाणार आहेत.


या टूर्नामेंटमध्ये दोन मोठे रॅकॉर्ड बनवण्याच्या मार्गावर असलेला भारतीय संघाचा उत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीवर सगळ्यांचे लक्ष असणार आहे.


आतापर्यंत वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 285 इनिंग्समध्ये विराटने 13,963 धावा केल्या आहेत. तसेच, सचिन तेंडूलकर आणि कुमार संगकारा हे दोनच खेळाडू 14000 धावांपर्यंत पोहचू शकले आहेत.


सचिन तेंडूलकरने 350 इनिंग्समध्ये हे यश संपादन केले आणि कुमार संगकाराला 14000 धावांपर्यंत पोहचण्यासाठी 378 इनिंग्स खेळाव्या लागल्या.


जर विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 263 धावा केल्या तर तो या टूर्नामेंटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.


आतापर्यंत हा रॅकॉर्ड 'युनिवर्स बॉस' क्रिस गेलच्या नावावर आहे. या खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 17 सामन्यांमध्ये 791 धावा केल्या आहेत. या टूर्नामेंटमध्ये क्रिस तीन शतक आणि एक अर्धशतकाचा मानकरी ठरला आहे.


कोहली ने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 13 सामन्यांत सरासरी 88.16 आणि 92.32 च्या स्ट्राइक रेटसोबत 529 धावा केल्या. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

VIEW ALL

Read Next Story