बऱ्याचदा घराजवळच्या खिडकीत कावळा येऊन काव- काव असा आवाज करतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे सर्व गोष्टींच्या मागे काही ना काही संकेत असतात.
अनेक संस्कृतींमध्ये घरासमोर येऊन कावळ्याचे काव-काव करणे शुभ मानले जाते. असं म्हणता की कावळा घराजवळ येऊन आवाज करू लागला की हे घरात पाहुणे येण्याचे संकेत देतात.
तर काहींच्या मते कावळा कोणत्या दिशेला बसला आहे आणि कसा आवाज करतोय यावरून शुभ अशुभ संकेत ठरले जातात.
कावळ्याला पाणी पिताना पाहणं हा धनलाभाचा संकेत आहे.
ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर तुम्हाला कावळ्याच्या चोचीत चपाती दिसली तर तुमच्या इच्छा पूर्ण होणार असा संकेत असतो.
कावळा जर सतत काव- काव करत असेल तर हे कार्यात बाधा आणण्याचे देखील संकेत असतात. हे शारीरिक आणि आर्थिक नुकसानीचे संकेत असू शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)