भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने क्रिकेट विश्वात मोठी कामगिरी करून जगात भारताचं नाव उंचावलं आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने पाकिस्तान विरुद्ध शतकीय कामगिरी केली.
36 वर्षांच्या विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या विजयानंतर टी 20 फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. असं असलं तरी तो सध्या वनडे आणि टेस्ट फॉरमॅटमध्ये खेळत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेनंतर भारताचा हा स्टार फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळकडून निवृत्ती झालेल्या भारतीय क्रिकेटर्सना पेन्शन देण्यात येते.
यात खेळाडूंनी भारतीय संघासाठी किती आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये सामने खेळले आहेत यानुसार त्यांच्या पेन्शनची रक्कम ठरते.
विराट कोहलीने 123 टेस्ट, 299 वनडे आणि 125 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने आतापर्यंत 35507 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीला निवृत्तीनंतर बीसीसीआयकडून अंदाजे 70 हजार रुपये प्रति महिना एवढी पेन्शन मिळेल.