मराठी मालिकाविश्वातून एक दु:खद बातमी समोर आलीय. विविध मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारे संतोष नलावडे यांचे निधन झालंय.
'लागीर झालं जी' फेम अभिनेता संतोष नलावडे यांचं 49 व्या वर्षी अपघाती निधन झालं.
नांदेडमध्ये क्रीडा स्पर्धेसाठी गेले असता त्यांचा अपघात झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
संतोष नलावडे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबासह मराठी मालिकाविश्वात शोककळा पसरली आहे.
संतोष नलावडे यांनी मराठीमधील 'लाखात एक आमचा दारा', 'अप्पी आमची कलेक्टर', 'शेतकरी नवरा हवा', यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
संतोष नलावडे यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी साताऱ्यात नेण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.