अनेकदा काम करतेवेळी किंवा अभ्यास करताना झोप आल्यावर कित्येकजण कॉफी पितात. असे केल्याने झोप जाते, असं म्हणतात.
मात्र, यामागचं नेमकं कारण तुम्हाला माहित आहे का? सविस्तर जाणून घेऊया.
खरंतर, कॉफीमध्ये कॅफिन नामक घटक असतो.
कॉफीमधील हा घटक मेंदूला सावध म्हणजेच अलर्ट करण्यास कारणीभूत ठरतो.
याच कारणामुळे कॉफी प्यायल्याने आपल्याला झोप येत नाही.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, संध्याकाळ नंतर कॉफीचे सेवन करणे टाळले पाहिजे.
कारण संध्याकाळच्या वेळी कॉफी प्यायल्याने पचनसंस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतात.
या व्यतिरिक्त, रात्री कॉफीचे सेवन केल्याने झोपेची कमतरता भासते आणि याचा आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो.