फोन आल्यावर HELLO का म्हणतात? 99 टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर!

Pravin Dabholkar
Feb 23,2025


समोरच्या व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी आपण हेलो शब्दाचा उपयोग करतो.


तसेच फोनवर बोलतानाही आपण हेलोने सुरुवात करतो. वर्षानुवर्षे ही पद्धत सुरु आहे.


पण हा शब्द कसा वापरात आला? याचा विचार कधी केलाय का?


प्राचीन फ्रान्स शब्द Hola तून हा शब्द आला. ज्याचा अर्थ कसे आहात? असा होतो.


फ्रान्स शब्द 1066 ईसवीच्या नारमन हल्ल्यावेळी इंगलिस्तानमध्ये पोहोचला होता.


पण 2-3 पिढ्यांमध्ये या शब्दाचा उच्चार बदलला.


इंग्रजी भाषेतील कवी चॉसर यांच्या काळापर्यंत म्हणजेच 1300 नंतर हा शब्द Hallow बनला होता.


मग शेक्सपियरच्या जमान्यात म्हणजेच 200 वर्षांनंतर Halloo शब्दाचा वापर झाला. मग Hallloa, Hallooa, Hollo असा वापर होऊ लागला.


वर्ष 1800 पर्यंत हा शब्द Hullo म्हणून उच्चारला जाऊ लागला.


काही वर्षांनंतर टेलिफोनचा शोध लागला मग या शब्दाला ओळख मिळाली. सुरुवातीला लोकं हेलो म्हणण्याऐवजी आर यू देअर? असे विचारले जायचे.


आपला आवाज पलिकडे पोहोचतोय? यावर त्यांना विश्वास नसायचा.


पण अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांना लांब शब्द आवडत नव्हता. त्यांनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा आपला आवाज पलिकडे जातोय, यावर त्यांना विश्वास होता.


त्यांनी फक्त हॅलो इतकेच म्हटले आणि यानंतर हा शब्द प्रचलित झाला.

VIEW ALL

Read Next Story