ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. त्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यात मदत करतात.
ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई असते, जे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. हे त्वचेला हायड्रेट ठेवते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड भूक कमी करण्यास मदत करतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑइल केसांना आर्द्रता प्रदान करते आणि त्यांना चमकदार बनवते. याशिवाय हे कोंडा आणि खाज सुटण्यापासून देखील आराम देऊ शकते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)