आपल्या शरीरासाठी पोषकतत्त्वांनी भरपूर आहार घेणे आवश्यक आहे आणि फळं ही आपल्यासाठी आरोग्यदायी असतात.
चवीला आंबट-गोड लागणारे किवी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किवीमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ आणि पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात आढळते. ही पोषकतत्त्वे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.
किवीमध्ये व्हिटॅमिन ए असते जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर यासारखे पोषक तत्त्वे आपल्या शरीरातील तापावर गुणकारी असतात.
किवीमधून मिळणारे व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.
बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी किवी खूप लाभदायक आहे. रोज 1 ते 2 किवी खाल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.
उपाशीपोटी किवी खाणे टाळावे. कारण उपाशीपोटी कोणतेही आंबट फळ खाल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)