अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमे ही 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते म्हणून याला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात.
भारतात विविध ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते.
महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे.
पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का प्यायले जाते याविषयी जाणून घेऊयात.
कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूमध्ये येत असून या दिवसात पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते.
बदलत्या वातावरणात शरीराला अधिक एनर्जीची गरज भासते. ही एनर्जी दुधातून कॅल्शियमच्या माध्यमातून मिळते.
याच कारणामुळे अनेक वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ सेवन करण्याची पद्धत आहे.
मसाला दूध बनवताना त्यात ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, दालचिनी, चारोळी असे पदार्थ मिसळल्याचे दुधाचे औषधी गुण वाढतात, तसेच ते चवीला सुद्धा अधिक स्वादिष्ट लागते.
शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्रप्रकाशात दूध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)