बऱ्याच लोकांच्या मते, मुघलांनी फक्त लाल-किल्ला किंवा हिमायूंचा मकबरा यांचीच निर्मिती केली आहे. जाणून घ्या, मुघलांच्या या वास्तूंची वैशिष्टपूर्ण निर्मिती.
दिल्लीमध्ये मुघलांनी बनवून घेतलेला 'सफदरजंग मकबरा' वैशिष्ट्यपूर्ण आहे. याची निर्मिती 1754 मध्ये करण्यात आली होती.
दिल्लीतील महरौली येथे स्थित असलेला 'जफर महाल' ही मुघलांनी निर्माण केलेली अंतिम वास्तू असल्याचे सांगितले जाते.
शाहजहानची पत्नी फतेहपुरी बेगम हीने 17 व्या शतकात 'फतेहपुरी मस्जिद'ची निर्मिती केली होती. लाल दगडांनी बनलेली ही वास्तू दिल्लीतील चांदनी चौक येथे आहे.
दिल्लीतील 'चांदनी चौक' या खास बाजाराला शाहजहानने मंजूरी दिली होती. चांदनी चौक येथील बाजाराची कल्पना शाहजहानची मुलगी जहांआराची होती.
अकबरच्या दौऱ्यात मुघल साम्राज्याचा हिस्सा असणाऱ्यांच्या सन्मानार्थ 'अतगा खानचा मकबरा' निर्माण करण्यात आला होता. हे 16 व्या शतकात हजरत निजामुद्दीन वस्तीजवळ बनवण्यात आले होते.
'जामा मस्जिद' हे भारतातील सर्वात मोठ्या मस्जिदपैकी एक आहे. जुन्या दिल्लीची ओळख असणारे हे मस्जिद शाहजहानने निर्माण करवून घेतले होते.
1570 मध्ये बनलेला 'हुमायूचा मकबरा' युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात सुद्धा सहभागी आहे.
17 व्या शतकात लाल-किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. मुघल सल्तनतचं केंद्र असलेला 'लाल-किल्ला' युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात समाविष्ट करण्यात आला आहे.
अब्दुल रहीमचा 'खान-ए-खानन मकबरा' रहीम यांच्या पत्नीने बांधला होता. खान-ए-खानन अब्दुल रहीम मुघल बादशाह अकबर यांच्या नवरत्नांपैकी एक होते.