नववधूंसाठी 10 हटके मजेशीर उखाणे; ऐकताच अहोंच्या चेहऱ्यावर येईल हसू

Pooja Pawar
Dec 03,2024


अटक मटक चवळी चटक, चवळीला आले मोड मोड .. राव तिळगुळासारखे गोड गोड


वड्यात वडा बटाटावडा …रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.


मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी ... रावांचं नाव घेते जय पब्जी


गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काळा काळा goggle, ….राव माझ्या प्रेमात झालेत पुरे पागल.


सप्तपदीच्या वाटेवर ….राव मी तुम्हाला साथ देईन, पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना मात्र माझ्यासाठी दोन ड्रेस आणि चार साड्या घेईन.


काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत, आमचे .... राव गेले ऑफिसला मला नाही करमत.


पौर्णिमेच्या चंद्रासारखा नवरा माझा चिकना बाई, पण माझा birthday जर विसरला तर त्याची खैर नाही.


नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट, चला ….राव पिक्चरला, सीट पकडू लास्ट.


I Love Burger With Extra Cheese .... रावांचं नाव घेते Excuse Me Please


जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस... राव माझे कॉम्प्युटर मी त्यांची माऊस


चांदीच्या परातीत केशराचे पेढे आमचे .... राव सोडून बाकी सगळे वेडे

VIEW ALL

Read Next Story