आपल्यापैकी कित्येकांना दुधीची भाजी किंवा डाळ आवडत नाही.
मग दुधीतील पोषक तत्वे मिळवण्यासाठी काय करावे? असा प्रश्न पडतो.
अशा वेळी दुधीचे पटकन तयार होणारे कोफ्ते बनवा. या कोफ्ता करीमुळे पोषक तत्वेही मिळतील आणि टेस्टदेखील.
सर्वप्रथम दुधी नीट धुवा आणि बारीक किसून घ्या.
खवलेल्या दुधीमध्ये बारीक चिरलेल्या मिर्च्या, आर्धा चमचा आल्याची पेस्ट, एक चमचा तिखट, एक कप चिरलेली कोथिंबीर आणि बेसन घाला.
यामध्ये आवश्यकतेनुसार मिठ घाला. त्यानंतर या मिश्रणाला 5-7 मिनिटे झाकून ठेवा.
त्यानंतर या मिश्रणाचे कोफ्ते तयार करून मध्यम आचेवर तळून घ्या.
कोफ्ते तयार झाल्यावर फोडणीसाठी कांदे, शिमला मिर्ची आणि हरव्या मिर्च्या चिरून घ्या आणि टॉमेटोची प्युरी तयार करा.
आता कढईत तेल टाका, त्यात हिंग, मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या.
फोडणीत चिरलेला कांदा, हिरव्या मिर्च्या आणि शिमला मिर्ची घाला. हळद, गरम मसाला, तिखट आणि इतर मसाले आवडीनुसार घाला. या भाज्या आणि मसाले शिजल्यावर टॉमेटोची प्युरी घाला.
आता तेल सुटेपर्यंत ही ग्रवी शिजवा. शेवटी आवडीनुसार पाणी टाका, त्यात हे कोफ्ते घालून 2 ते 3 मिनिटे शिजवा.
रेस्ट्रोरेन्ट स्टाईल कोफ्ता करी सजावट करुन सर्व्ह करा.