काजू बदामपेक्षा जास्त आरोग्यदायी आहे 'हे' फळ; जाणून घ्या याचे 5 चमत्कारिक फायदे

Jan 17,2025


हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खाल्ला जाणारा सिताफळ हे एक अतिशय गुणकारी फळ आहे.


सिताफळ चवीला अगदी मधुर, गोड असून हा फळ आरोग्याचा खजिना मानला जातो. याच्या पाच फायद्यांविषयी जाणून घ्या.

चयापचन

सिताफळमध्ये फायबर हे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आढळते. हे फायबर आपल्या पाचनक्रियेला मजबूत बनवते.

डोळे

सिताफळमध्ये असलेला व्हिटामिन ए डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी वरदान मानलं जातं.

5. रक्तदाब

आजकाल रक्तदाब ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. अशा वेळी सिताफळमध्ये असलेले 'पोटॅशियम' ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यात मदत करते.

रक्त

फक्त लाल फळे नाही तर सिताफळदेखील रक्त निर्मितीस मदत करते. यामध्ये असलेले 'लोह' मोठ्या प्रमाणात रक्त तयार करते.

रोगप्रतिकारक शक्ती

अनेक आजारांपासून बचावासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे खूप आवश्यक आहे. अशा वेळी सिताफळमध्ये भरपूर प्रमाणात असलेले 'व्हिटामिन सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story