सध्या अनेकांना तरुणपणीच पांढऱ्या केसांची समस्या आहे. त्यामुळे कमी वयातच अनेकजण हेअरडायचा उपयोग करताना दिसतात.
मात्र वारंवार हेअर डायचा वापर केल्याने केस खराब होतात आणि तुटतात.
अनेकदा कळत नाही की तरुणपणीच केस पांढरे का होतायत? यामागचं कारण व्हिटॅमिनची कमतरता सुद्धा असू शकतं.
शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे केस पांढरे होऊ लागतात.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात मेलेनिनचे उत्पादन कमी होऊ लागते. याच कारणामुळे केस लवकर पांढरे होऊ लागतात.
व्हिटॅमिन बी 12 ची शरीरात कमतरता होते तेव्हा केसांच्या मुळांपर्यंत पोषण नीट पोहचत नाही ज्यामुळे केस गळू लागतात.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आहारात मासे, चिकन, दूध, डेअरी प्रोडक्ट्स इत्यादींचा वापर करावा.
जर तुम्हाला वाटतं की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होऊ नये तर धुम्रपान आणि तळलेल्या गोष्टींपासून दूर राहा.
व्हिटॅमिन बी 12 शिवाय कॅल्शियम, कॉपर, आयरन आणि फॉलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे देखील केस वेळेआधीच पांढरी होऊ लागतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)