आजकाल भारतीयांमध्ये कोरियन ब्यूटी सीक्रेट्स प्रचलित झाल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. कोरियन मुली त्वचेला चमकदार बनवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करतात.
तांदळाच्या पाण्याच्या सहाय्याने ग्लाससारखी ग्लोइंग त्वचा मिळवता येते. तांदळामध्ये असलेल्या अँटीऑक्सीडेंट्समुळे सेल्स पुन्हा बनण्यास मदत होते आणि त्वचा चमकदार होण्यास फायदेशीर ठरते.
चेहऱ्यावर पिंपल्स किंवा अॅक्नेमुळे सूज आली असेल तर तांदळाच्या पाण्याचा वापर केल्याने ती कमी केली जाऊ शकते. यासाठी चेहऱ्यावर कापसाने थंड तांदळाचे पाणी लावा.
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेचा ड्रायनेस कमी होऊन त्वचा हायड्रेटड राहण्यास मदत होते. अंघोळीनंतर चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने बरेच फायदे मिळतात.
चेहऱ्यावर नियमितपणे तांदळाचे पाणी लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. तांदळाच्या पाण्यामधून त्वचेसाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन B मिळते.
तांदळाच्या पाण्यामधील गुणधर्मांमुळे प्रिमॅच्युअर एजिंगपासून बचाव करता येऊ शकतो. तांदळाच्या पाण्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील सुरकूत्यादेखील कमी होण्यास मदत होते.
रात्री तांदूळ भिजत ठेवून सकाळी अंघोळीच्या आधी थोडा वेळ केसांवर लावल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)