आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
चाणक्य यांच्या मते, कठोर बोलणे हे आगीत जळण्यापेक्षा जास्त वेदनादायक असते.
तलवारीची जखम बरी होते असे सर्वच म्हणतात, पण कठोर शब्दांची जखम ह्रदयावर कायम असते.
आचार्य चाणक्य म्हणतात की, तर्कहीन माणसाला जेव्हा राग येतो. तेव्हा त्याचे बोलणेही कठोर होते.
मग तो विचार न करता अशा गोष्टी बोलू लागतो. ज्या कायम इतरांच्या ह्रदयात घुसून राहतात. चाणक्य यांच्या मते, कठोर भाषण हे भविष्यातील विवादांचे बीज आहे.
त्यामुळे संत-मुनींनी सांगितले आहे की, लोकांनी कठोर शब्द टाळावेत. गोड बोलण्याने माणूस आपल्या शत्रूंनाही मित्र बनवू शकतो.