भारत आणि न्यूझीलंडदरम्यान बुधवारपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर रंगणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने एक असं वक्तव्य केलं, ज्यावरुन रोहित आणि कोच गौतम गंभीरमध्ये मतभेद असल्याचं उघड झालंय.
कोच गौतम गंभीरने गोलंदाजांचं कौतुक केलं होतं. गोलंदाज हे संघाला विजेता बनवतात, फलंदाज केवळ सामना रंगवतात, असं गंभीरने म्हटलं.
फलंदाजांनी 1000 धावा केल्यानंतरही सामना जिंकता येईल हे सांगता येत नाही, पण गोलंदाजांनी 20 विकेट घेतल्यास 99 टक्के सामना जिंकता येतो, असं गंभीरने म्हटलंय.
यावर रोहितने उत्तर दिलंय. कसोटी सामना जिंकण्यासाठी फलंदाजही गरजेचे आहेत, जे धावा करु शकतात. त्यामुळे संघात दोघांचीही महत्त्वाची भूमिका असते असं रोहितने म्हटलंय
संघातील सर्व अकरा खेळाडू मॅच विनर असायला हवेत, फलंदाजांनी चांगल्या धावा केल्यास गोलंदाजांना तणावपूर्ण गोलंदाजी करता येते, असं रोहितने सांगितलंय.
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण त्याआधी रोहित आणि गंभीरमधल्या मतभेदाने चर्चांना उधाण आलं आहे.