दही हे आपल्याला शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतं.
दहीचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं.
दही हे प्रोबायोटिक असल्याने आतड्यांमध्ये निरोगी बॅक्टेरिया मिळतात.
दह्याचं सेवन हे योग्यरित्या नाही केल्यास आपल्याला त्याचा फायदा मिळत नाही.
अशात दह्यासोबत साखर की मीठ कशासोबत सेवन करावं असा प्रश्न अनेक वेळा सर्वसामान्यांना पडतो.
साखर मिश्रत दही खाल्ल्यास दह्याचं आंबटपणा कमी होऊन त्याची चव वाढते.
दह्यामध्ये साखर घातल्याने कॅलरीजचे प्रमाण वाढतं आणि शरीरात साखरेचं प्रमाण वाढतं.
तसंच दह्यात साखर मिक्स करुन सेवन केल्यास वजन वाढतं.
तर दह्यात मीठ घातल्याने त्याची चव वाढते पण जास्त प्रमाणात मीठ मिसळून दही खाल्ल्याने बीपी आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
पण जे लोक वर्कआउट करतात त्यांनी दह्यात मीठ मिक्स करुन खाल्ल्यास फायदा मिळतो.
तज्ज्ञ सांगतात की निरोगी राहण्यासाठी दह्याचं सेवन साधे करावं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)