1 फेब्रुवारीलाच का सादर केलं जात देशाचं बजेट?

Pooja Pawar
Feb 01,2025


1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2025 -26 साठी बजेट सादर केलं.


पण तुम्हाला माहितीये का की पूर्वी हे बजेट 1 फेब्रुवारी नाही तर 28 फेब्रुवारीला जाहीर केले जायचे.


ब्रिटिश काळापासून देशाचं बजेट हे 28 फेब्रुवारी रोजी जाहीर केलं जायचं.


परंतु त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही परंपरा खंडित करून बजेट 28 फेब्रुवारी नाही तर 1 फेब्रुवारीला सादर केलं जाऊ लागलं.


याच कारण असं की फेब्रुवारीच्या 28 तारखेपासून 31 मार्च पर्यंत आर्थिक वर्ष संपायला केवळ 1 महिना शिल्लक असायचा.


केवळ 1 महिन्याच्या अवधीमध्ये योजना आणि पैशांचं वितरण होऊ शकत नव्हतं.


याच कारणामुळे मोदी सरकारने केवळ बजेटची तारीखच नाही तर बजेट सादर करण्याची वेळ सुद्धा बदलली.


बजेट पूर्वी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केलं जायचं, परंतु आता हे बजेट सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता करण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story