ओट्स खाल्ल्याने शरिराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्व मिळतात. यामुळे शरिरात उर्जा बनून राहते.
ओट्समध्ये मॅगनीझ, फॉस्फरस,मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, फॉलेट, विटामिन बी 6 आणि थायमिन सारख पोषक तत्व असतात.
काही लोकांनी ओट्स खाऊ नये असे न्यूट्रिशियनिस्ट नमामी अग्रवाल सांगतात.
तुम्हाला पोटदुखी, डायरिया, पोट फुगणे अशा समस्या असतील तर ओट्सचे सेवन करु नये.
पित्त उसळणे, त्वचेवर खाज उटणे अशा अॅलर्जीची समस्या असेल तर ओट्स खाऊ नये.
यातील फॉस्फरसचे जास्त सेवन किडनीवर परिणाम करते. त्यामुळे किडनीची समस्या असलेल्यांनी ओट्स खाऊ नये.
तुम्ही रोज एक वाटी ओट्स खाऊ शकता पण मधुमेहाचे रुग्ण असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचे सेवन करा.