तांदळाचे पाणी वापरून तुम्ही कोरियन ग्लास स्किन मिळवू शकता. यासाठी तुम्ही अश्याप्रकारे तांदळाचे पाणी तयार करू शकता.
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर तांदळाला पाण्यात भिजवून ठेवा किंवा पाण्यात उकळून घ्या.
हे पाणी थोडं थंड होऊ द्या आणि नंतर कापसाच्या मदतीने ते पूर्ण चेहऱ्यावर लावा. तुम्ही याला टोनर म्हणूनही वापरू शकता.
जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल, तर दररोज तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचा ताजीतवानी राहते.
तांदळाचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामधील पोषक घटक तुमच्या चेहऱ्याला चमकदार आणि गुळगुळीत बनवतात.
तांदळाच्या पाण्यात असलेली जीवनसत्त्वे त्वचेला मॉइश्चरायझ करतात आणि खोलवर हायड्रेट करतात.
तांदळाचे पाणी चेहऱ्यावरील घाण, तेल काढून टाकतात आणि चेहऱ्यावरील छिद्र उघडतात. तसेच मुरुमांची समस्याही कमी करतात.
तांदळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला ताजेपण ठेवतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)