एका पदार्थामुळे साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ आणि सुटसुटीत होते. महाशिवरात्रीच्या उपवासाला ही ट्रीक नक्की ट्राय करा.
उपवासात अनेक साबुदाण्याची खातात. साबुदाण्याची खिचडी अतिशय टेस्टी लागते. शिवाय यामुळे शरीराला उर्जा देखील मिळतो. यामुळे अनेक जण उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी खातात.
साबुदाण्याची खिचडी करताना सर्वात महत्वाचे म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजला पाहिजे.
शक्यतो आदल्या दिवशी रात्रीच साबुदाणा भिजत घालावा. यात पाण्याचे प्रामाण योग्य असावे.
खिडची करण्यापूर्वी भिजवलेला साबुदाणा हाताने सुट्टा करावा. या भिजवलेल्या साबुदाण्यात प्रमाणानुसार शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित मिक्स करावे.
एका कढईत तेल गरम करावे यात मिरच्या घालाव्यात. तुमच्या आवडीनुसार बटाटा देखील टाकू शकता.
मिरच्या भाजल्यावर यात साबुदाणा आणि शेंगदाणा याचे मिश्रण घालून चवीनुसार मीठ टाकावे. हा मिश्रण चांगले परतावे.
आता सर्वात महत्वाचे. साबुदाणा परतून घेत असतानाच यात तीन ते चार चमचे दूध टाकावे. पुन्हा एकदा छान परतून घ्यावे. झाकण झाकूण गॅस बंद करावा. दोन ते तीन मिनीट झाकण तसेच ठेवावे.
साबुदाणा परतून घेत असताना यात दूध टाकल्यामुळे साबुदाण्याची खिचडी कापसासारखी मऊ होते.