फेसवॉश किंवा क्रिमने नाही, तर मीठाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा चमकेल
असं म्हटलं जातं की, चेहरा मीठाच्या पाण्याने धुतल्यास त्वचा तरुण दिसते.
यासाठी सामान्य मीठाऐवजी समुद्री मीठ वापरणे अधिक फायदेशीर ठरते, असे काहींचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मते, मीठ पाण्यात मिसळून तोंड धुतल्याने त्वचा उजळते.
मीठाच्या पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर असले तरी ते प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही.
त्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते. जर त्वचा तेलकट असेल, तर मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने अतिरिक्त तेल दूर करण्यास मदत होते.
मात्र ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील किंवा खूप कोरडी आहे. त्यांनी मिठाच्या पाण्याचा वापर टाळावा.
तसेच त्वचेवर कोणत्याही प्रकारची जखम असल्यास मिठाच्या पाण्याचा वापर करू नये, कारण त्यामुळे जळजळ, खाज सुटणे किंवा इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)