प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील एका एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका अश्लील प्रश्नावरून तो सध्या ट्रोल होतोय.
एवढंच नाही तर रणवीर अलाहबादिया विरुद्ध FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलंय. रणवीर अलाहबादियाची सोशल मीडियावर मिलियनमध्ये फॅन फॉलोईंग आहे.
रणवीर अलाहबादियाचं पाकिस्तानशी असलेलं कनेक्शन त्यानेच एका मुलाखतीत सांगितलं होतं.
रणवीर याचं अलाहबादिया हे आडनाव ऐकल्यावर त्यांचं इलाहबाद (प्रयागराज) सोबत काही नातं असेल असं वाटतं. परंतु रणवीरने सांगितलं होतं की त्याचं कुटुंब हे पाकिस्तानवरून भारतात आलं होतं.
रणवीर अलाहबादिया याच कुटुंब पाकिस्तानहून भारतात आलं होतं. त्याचे आजोबा हे प्रोफेसर होते त्यामुळे त्यांना एका व्यक्तीने 'इलमवादी' असं टायटल दिलं होतं.
परंतु भारतात आल्यावर त्यांना लोकं 'इलमवादी' वरून 'अलाहबादिया' असं म्हणू लागले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं टायटल हे अलाहबादिया असं आहे.
रणवीर अलाहबादियाच खरं नाव रणवीर सिंह अरोड़ा आहे. याच खरं नाव आणि कुटुंबाचं पाकिस्तानशी असलेल्या कनेक्शनचा रणवीरने स्वतः खुलासा केला होता.