'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 31 कोटींचा गल्ला केला आहे.
त्यामुळे आता चर्चा रंगली आहे ती त्याच्या बजेटची की किती बजेट होतं.
'छावा' या चित्रपटाचं बजेट हे 130 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जातंय.
त्यातुनही चित्रपटानं पहिल्याच दिवशी 31 कोटींच्या जवळपास गल्ला केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं.
हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.
या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत असून हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.